लोकशाही गळचेपी.
#लोकशाहीची_गळचेपी!
 
     तुम्हाला चोर म्हणले
  खासदारकी हिरावून घेतली
    पंधरा लाखाची थैली
  तुम्ही कुठे नेहून ठेवली.
    खोटी आश्वासने देऊन
  रोजगार नाही दिला
    देशातला तरुण वर्ग
  बेरोजगार तुम्ही केला.
     देशाला चुना लावून
  भांडवलदार पळून गेले
    जाब विचारतेय जनता
  त्यांचं तुम्ही काय केले.
     विमानतळ अन् कारखाने
  भांडवलदारांच्या घशात घातले
    देशाचे खाजगीकरण करून
  काय विकायचे बाकी ठेवले.
     उद्या भर बाजारात
  भक्तांचा सुद्धा लिलाव होईल
    तेव्हा कुठे अंधभक्तांना
  थोडीफार जाग येईल!
        Thanks