शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस यांना पक्का गोठा बांधण्यासाठी 100 टक्के अनुदान

Government scheme: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस यांना पक्का गोठा बांधण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून दोन ते सहा गुंठा मध्ये एक गोठा बांधता येतो. सरकारने ही योजना 3 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू केली होती. या योजने अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक मिळाला आहे.
शरद पवार ग्रामसमृद्धी या योजनेद्वारे आपल्याला जवळपास 77 हजार 188 रुपये इतके अनुदान दिले जाते. म्हणजे सहाच्या पटीत हे अनुदान दिले जाते म्हणजेच बारा गुरांसाठी दुप्पट, 18 गुरांसाठी तीन पट इतके अनुदान दिले जाते. शरद पवार ग्रामसमृद्धी या योजने अंतर्गत आपल्याला 4 गोष्टींसाठी चक्क 100 टक्के अनुदान सुध्दा दिले जाते. तर त्या चार खालील प्रमाणे आहेत.
1) गाय व म्हैस यांच्या साठी गोठा बांधण्यासाठी.
2) शेळी पालन साठी शेड बांधण्यासाठी.
3) संजीवनी नाडेप कंपोस्ट साठी सुध्दा अनुदान दिले जाते.
4) कुकुट पालन साठी शेड बांधण्यासाठी.
वरील चार गोष्टींसाठी या योजनेतून पशुपालन धारकांना 100 टक्के अनुदान दिले जाते. Government scheme
खालील दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता…
https://maharashtra.gov.in/1125/Home
शरद पवार ग्रामसमृद्धी या योजनेमध्ये माध्यमातून शेळी पालन शेड बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 10 शेळ्या याकरिता शेड बनण्यासाठी 49,284 इतके रुपये अनुदान दिले जाते. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. आपल्याकडे 150 पेक्षा जास्त पक्षी असतील तर कुकुट पालन शेड भरण्यासाठी आपल्याला 49,760 इतके रुपये अनुदान दिले जाते.
जर काही शेतकऱ्यांकडे 100 पक्षी असतील तर तुम्हाला एका बोर्डवर स्टॅम्प पेपर वर दोन जामीनदार शेवटी मागणी देखील करता येईल यासाठी तुम्हाला यंत्रणेने शेत मंजूर करावे लागेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये तुम्हाला कमीत कमी 100 पक्षी ठेवणे गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला अनुदान वितरीत केले जाईल. अशाप्रकारे आम्हाला माहिती मिळाले असून जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकतात.
Follow शिवना माई काॅर्नर to stay updated on their latest posts!
0 comments
Be the first to comment!
This post is waiting for your feedback.
Share your thoughts and join the conversation.