जीवनाच्या वाटेवर..
#जीवनाच्या_वाटेवर!
जीवनाच्या वाटेवरती
जपून चालावं लागतं
चुकीचं पडलेलं पाऊल
जीवन संपवून टाकतं.
तुम्ही फोडलेला टाहो
कुणाच्या कानी पडत नाही
संकटात अडकलेला पाय
सहजासहजी सुटत नाही.
एकदा पाय अडकल्यावर
निर्थरक ठरते धडपड
होत राहते पुन्हा
नुसती जीवाची फडफड.
रोजच् उघड्या डोळ्यांनी
स्वतःच मरण बघावं लागतं
न सोसणाऱ्या वेदनांना
गपगुमान सोसावं लागतं.
संकटात अडकून पडल्यावर
मदतीला कुणी येत नाही
खंगुन खंगून मरण्याशिवाय
दुसरा पर्याय उरत नाही!
Thanks..