
#शिवबाराजे!
राजे तुमच्या शौर्याला
आम्हीं पदोपदी आठवतोय
रायगडाच्या पायरीवर
श्रद्धेनं मस्तक टेकवतोय.
तुम्हीं दिलेला स्वाभिमान
उरात ठासून ठेवलाय
त्यागाचा भगवा राजे
जीवापाड आम्हीं जपलाय.
संकटावर मात करायला
राजे तुमच्याकडून शिकलोत
भयाण अश्या वावटळीत
स्वतःच्या हिंमतीवर टिकलोत.
राजे आजही आम्हांला
उणीव तुमची जाणवतेय
सह्याद्रीची पर्वतरांग
वाट तुमची बघतेय.
तुम्हीं निर्मिलेलं स्वराज्य
आम्हांलाच टिकवाव लागेल
विस्कटलेल्या घडीला
पुन्हां सावराव लागेल!
(💐 *बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!*💐
जय शिवराय...
Sapankar sirさんをフォローして最新の投稿をチェックしよう!
0 件のコメント
この投稿にコメントしよう!
この投稿にはまだコメントがありません。
ぜひあなたの声を聞かせてください。